Adarsh Foundation
समाजातील सर्व घटकांसाठी प्रत्येक सुविधा एका जागी मिळाव्या यासाठी आमची संपूर्ण टीम कार्य करते. साथ आमची... यश तुमचे ...
Tuesday, 31 December 2019
Saturday, 7 December 2019
*एसएससी मध्ये एकत्रीक उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०१९ जाहीर*
☑ *एसएससी मध्ये एकत्रीक उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०१९ जाहीर*
✍ पद : कनिष्ठ विभागीय लिपिक, पोस्टल सहाय्यक/क्रमवारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
✍ पदसंख्या : भरपूर
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ आणि ४ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा बारावी समकक्ष उत्तीर्ण
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते २७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० जानेवारी २०२०
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ *ADARSH FOUNDATION*
आपले सरकार सेवा केंद्र बाजार चौक कचारी सावंगा ता. काटोल जि. नागपूर 441103
☎: 8805826526
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ *ADARSH FOUNDATION*
आपले सरकार सेवा केंद्र बाजार चौक कचारी सावंगा ता. काटोल जि. नागपूर 441103
☎: 8805826526
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Facebook Page: https://www.facebook.com/surreta
Twitter: https://twitter.com/kale2297
Facebook : https://www.facebook.com/people/Nitin-P-Kale/100006098235270
Our Website: http://naukri.surreta.com/
Our WhatsApp Group Link: https://chat.whatsapp.com/C8kfL8WDneqAAkcTxsPjKk
[current-user:profile-social-media:field_youtube_channel]
Facebook Page: https://www.facebook.com/surreta
Twitter: https://twitter.com/kale2297
Facebook : https://www.facebook.com/people/Nitin-P-Kale/100006098235270
Our Website: http://naukri.surreta.com/
Our WhatsApp Group Link: https://chat.whatsapp.com/C8kfL8WDneqAAkcTxsPjKk
[current-user:profile-social-media:field_youtube_channel]
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
Friday, 1 November 2019
Wednesday, 16 October 2019
बीज भांडवल कर्ज योजना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित बीज भांडवल कर्ज योजना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहकार्याने अल्प व्याजदराने रू. 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची असून जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
व्यवस्थापकीय संचालक, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, 1 ला माळा, गुलमोहर क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई – 400 049. दुरध्वनी क्रमांक 022-26202588 , 26202586
पंतप्रधान जनधन योजना
प्रस्तावना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी बॅंक खाते असावे, ही महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री जनधन या नावाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 7.50 कोटी कुटुंबांना बॅंक खात्यांच्या कार्यक्षेत आणावयाचे आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, यासाठी बॅंक खाते सुरू करण्याची प्रक्रिया रिजर्व्ह बॅंकने मार्गदर्शन करून अधिकाधिक सहज व सोपी केली आहे. त्यासाठी रिजर्व्ह बॅंकेने काही सूचना केल्या आहेत. योजना जाहीर झाल्यापासून 4 ऑक्टोबर 2014 पर्यंत 5.5 कोटी खाती उघडण्यात आली आहेत.
या योजनेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक कुटुंबांना यात सहभागी करून घेण्यासाठी बॅंकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या कुटुंबांची बॅंक खाती नाहीत त्यांना खाते उघडण्यास योग्य त्या सुविधा पुरवावयाच्या आहेत. त्यासाठी रिजर्व्ह बॅंकेने केवायसी (KYC- Know Your Coustomer) निकष अधिक सुलभ केले आहेत. या योजनेअंतर्गत उघडावयाच्या बॅंक खात्यासाठी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, फेरीवाले, विक्रेते, घरकाम करणारे, सुरक्षारक्षक, रोजंदारी किंवा नैमित्तिक कामगार अशा घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांना या बॅंकिंगच्या छत्रछायेत आणण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बॅंकिंगच्या छत्रछायेत आणण्यासाठीच्या उपाययोजना
ओळख आणि रहिवासाचा एकच पुरावा
ओळख आणि रहिवास दोहोंचे वेगवेगळे दोन पुरावे देण्याची आवश्यकता नसून आता एकच पुरावा देता येईल. यामध्ये पासपोर्ट, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड, राज्य शासनाने दिलेले नरेगाचे रोजगार कार्ड यांचा समावेश आहे. आधारकार्ड नसेल तर रेशनकार्ड, गॅझेटेड अधिकाऱ्याकडील पत्र, सरपंचांनी दिलेले ओळख प्रमाणपत्र, वीज किंवा टेलिफोन बील, जन्म किंवा विवाहाचे प्रमाणपत्र चालू शकतील.
तात्पुरता पत्ता म्हणून वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही
ज्या घटकांना या योजनेत समाविष्ट करावयाचे आहे त्यात स्थलांतरित मजूर, बदली होणारे कर्मचारी आदींचा समावेश असल्याने त्यांना तात्पुरता पत्ता म्हणून पुरावा देण्यात बऱ्याचदा अडचणी येतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी कायमचा पत्ता व तात्पुरता पत्ता असे दोन वेगवेगळे पुरावे देण्याची आवश्यकता नाही. तसेच पत्ता बदल करताना आपल्या पत्ता बदलाबाबत स्वतःचे प्रतिज्ञापत्र द्यावयाचे आहे.
खाते स्थलांतरीत करताना पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही
एकाच बॅंकेच्या अन्य शाखेत खाते स्थलांतरित करताना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. सदरचा खातेधारक हा केवळ आपले पत्ता बदलाचे प्रतिज्ञापत्र देऊन खाते स्थलांतरित करू शकतो.
ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यांच्यासाठी लघु खाते योजना
असेही काही लोक आहेत की ज्यांच्याकडे वरीलपैकी कोणतेही पुरावे नाहीत, असे लोकही लघु खाते (Small Account) उघडू शकतात. त्यासाठी त्यांना बॅंकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष केवळ स्वतः साक्षांकित केलेले अथवा अंगठ्याचा ठसा असलेले स्वतःचे छायाचित्र देऊन खाते उघडता येईल. मात्र अशा खात्यांवरील व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात एका वर्षात एकावेळी एक लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा आणि एका महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. किमान वर्षभरानंतर ही खाती अधिकृत मानली जातील. त्यानंतर जर संबंधित खातेदाराने कोणताही अधिकृत पुरावा मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास पुन्हा वर्षभरासाठी हे खाते चालविता येईल.
कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी सवलती
वरीलपैकी कोणतेही अधिकृत पुरावे नसल्यास आणि बॅंकांनी घोषित केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटांपैकी असल्यास त्यांनाही खाते उघडण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने अथवा एखाद्या नियामक प्राधिकरण, सार्वजनिक उपक्रम, शेड्युल्ड कमर्शियल बॅंक, सार्वजनिक वित्तीय संस्था यांचे ओळखपत्र तसेच एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेले व स्वतःचे छायाचित्र असलेले पत्र दिल्यास त्यांना खाते उघडता येईल.
खात्याचे अद्ययावतीकरण करण्याच्या कालावधीत बदल
विशिष्ट कालावधीनंतर केवायसी (KYC- Know Your Coustomer) माहिती अद्ययावतीकरण करण्याच्या कालावधीतही कमी, मध्यम आणि उच्च जोखमीच्या ग्राहकांसाठी आता पाच ते दोन वर्षांएवजी दहा-आठ आणि दोन वर्षे इतका करण्यात आला आहे.
इतर सवलती
अ) स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी केवायसी (KYC- Know Your Coustomer) माहिती प्रमाणिकरणाची आवश्यकता नाही. त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्याच ओळखीची पडताळणी होईल.
ब) विदेशी विद्यार्थ्यांना स्थानिक पत्त्याच्या पुराव्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल.
क) बॅंकांनी घोषित केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटांपैकी असल्यास त्यांना पुरावे सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात येईल.
वरील उपाययोजनांमुळे आता पंतप्रधान जनधन योजनेत बँक खाते उघडणे आता सहज आणि अधिक सोपे झाले आहे.
ब) विदेशी विद्यार्थ्यांना स्थानिक पत्त्याच्या पुराव्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल.
क) बॅंकांनी घोषित केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटांपैकी असल्यास त्यांना पुरावे सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात येईल.
वरील उपाययोजनांमुळे आता पंतप्रधान जनधन योजनेत बँक खाते उघडणे आता सहज आणि अधिक सोपे झाले आहे.
Friday, 23 August 2019
पीएमकिसान मानधन साठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नागपूर जिल्ह्यातील सर्व व्हीएलइ यांनी जास्तीत जास्त शेतकरी सन्मान योजना चा लाभ शेतकर्यांना द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहो. खालील लिंक च्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकऱ्यांची तुम्ही माहिती मिळवून त्यांना या सुविधेचा लाभ मिळवून देऊ शकता यासाठी काही समस्या असल्यास उमेशजी मानमोडे सर तसेच प्रशांत झाडे सर यांच्याशी संपर्क साधावा....
माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://locator.csccloud.in/PMKisan/
माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://locator.csccloud.in/PMKisan/
Tuesday, 30 July 2019
आयसीआय लोंबार्ड कंपनीचे मागील वर्षी काढलेल्या शेती विम्याचे पैसे खात्यात जमा केल्याबद्दल हार्दिक आभार
आयसीआय लोंबार्ड कंपनीचे मागील वर्षी काढलेल्या शेती विम्याचे पैसे खात्यात जमा केल्याबद्दल हार्दिक आभार
वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि कंपनीने दिलेला प्रतिसाद यामुळे सगळं शक्य झालं .. आज 20- 30 शेतकऱ्यांनी भेट देऊन माझे आभार मानले त्यामुळं खरोखर धन्य झालो.. जीवनात अनुभवलेला खूप सुंदर अनुभव आला
सर्वात जास्त फॉर्म भरून मीच कंटाळून गेलो होतो असे वाटत होते की काही भरून फायदा नाही झाला कारण वर्षभर लोकांनी खूपच त्रास दिला पण वेळ लागली पण सगळं ठीक झालं आज खूप आनंद झाला हे ऐकून
धन्यवाद सीएससी टीम
नितीन काळे व्हिएलइ
वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि कंपनीने दिलेला प्रतिसाद यामुळे सगळं शक्य झालं .. आज 20- 30 शेतकऱ्यांनी भेट देऊन माझे आभार मानले त्यामुळं खरोखर धन्य झालो.. जीवनात अनुभवलेला खूप सुंदर अनुभव आला
सर्वात जास्त फॉर्म भरून मीच कंटाळून गेलो होतो असे वाटत होते की काही भरून फायदा नाही झाला कारण वर्षभर लोकांनी खूपच त्रास दिला पण वेळ लागली पण सगळं ठीक झालं आज खूप आनंद झाला हे ऐकून
धन्यवाद सीएससी टीम
नितीन काळे व्हिएलइ
Subscribe to:
Posts (Atom)
-
फक्त इंस्टाल करा आणि शेअर करा आणि नेहमीसाठी मोबाइल मध्ये असू द्या मग नवनवीन टीम बनवा आणि मिळवा खूप पैसे ते पण आपल्या मोबाईल द्वारे.. र...