Tuesday, 23 October 2018

सहवास नव्या व्यक्तींचा

मित्रांच्या सोबत राहणे आणि फिरणे मौज करणे मला कधीच आवडले नाही. लहानपणापासून एकच सवय कि मोठ्या व्यक्तींशी परिचय करून त्यांच्याशी सहवास साधने . यातून मला नवनवीन व्यक्तीशी संपर्क साधून खूप काही शिकायला मिळाले. शिक्षणाविषयी असलेली गोडी केव्हा माणसांमध्ये मला यायला लागली कळलच नाही- आज पण माणसे जोडणे मला खूप आवडते. एक काम कमी केले तरी चालेल पण दिवसभरातून निदान एक तरी नवीन व्यक्ती आपण जोडायला हवा असे माझे म्हणणे आहे चला असो कुणाला काय आवडते तर कुणाला काय. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी. सध्या माझ्या सहवासात खूप मोठा समूह तयार झाला आहे आणि मी त्याच समूहात खूप काही शिकतो. मिळणारी प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी नवीन शिकवून जाते आणि त्यामुळे माझ्यात अनेक नवीन बदल घडून येतात त्याचा मला या जीवनात सोबत भावी आयुष्यात खूप खूप फायदाच होईल. मिळणारी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाची असल्याने त्यांच्याशी मिळून मिसळून राहायला आणि सोबत नवीन शिकायला खूप आनंद वाटतो प्रत्येक जन आपल्या आयुष्यातील अनुभव सांगतात त्यामुळे या असलेल्या सगळ्या मोठ्या व्यक्ती माझ्यासारख्या मुलाला खूप काही शिकवतात ते पण नकळतपने. यांच्याच कृपाशीर्वादाने मी जीवनात नक्कीच यशस्वी होईल आणि सामान्य जनतेसाठी काहीतरी नवीन करू शकेल माझ्या नेटवर्क चा मला आणि समाजाला पुढील सहजीवनात फार मोठ्या प्रमाणात आसरा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचा सहवास असाच सोबत असावा हीच आशा-


तुमचा नितीन
सहवास - भाग १ 

Wednesday, 10 October 2018

ZP RECRUITMENT NEW