Tuesday, 30 July 2019

आयसीआय लोंबार्ड कंपनीचे मागील वर्षी काढलेल्या शेती विम्याचे पैसे खात्यात जमा केल्याबद्दल हार्दिक आभार

आयसीआय लोंबार्ड कंपनीचे  मागील वर्षी काढलेल्या शेती विम्याचे पैसे खात्यात जमा केल्याबद्दल हार्दिक आभार
वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि कंपनीने दिलेला प्रतिसाद यामुळे सगळं शक्य झालं .. आज 20- 30 शेतकऱ्यांनी भेट देऊन माझे आभार मानले त्यामुळं खरोखर धन्य झालो.. जीवनात अनुभवलेला खूप सुंदर अनुभव आला
सर्वात जास्त फॉर्म भरून मीच कंटाळून गेलो होतो असे वाटत होते की काही भरून फायदा नाही झाला कारण वर्षभर लोकांनी खूपच त्रास दिला पण वेळ लागली पण सगळं ठीक झालं आज खूप आनंद झाला हे ऐकून
धन्यवाद सीएससी टीम



नितीन काळे व्हिएलइ

प्रत्येक शेतकर्या पर्यंत ही माहिती पोहचलीच पाहिजे

प्रत्येक शेतकर्या पर्यंत ही माहिती पोहचलीच पाहिजे

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
३ योजना, ५ बाब !!
३४ जिल्हे आणि ३५१ तालुके !!

१) योजनेचे नाव - सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे
२) योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे
३) योजनेचे नाव -१००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे

शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या वैयक्तिक / सामाजिक विकासासाठी पशुसंवर्धन कार्यालयामार्फत (महाराष्ट्र राज्य सरकार) अनेक योजना राबविल्या जातात. दर वर्षी अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. या योजनांची संपूर्ण माहिती व तपशील या मोबाइल ॲप्लिकेशन च्या आधारे मिळेल आणि शासनाच्या विविध योजनाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल.

इंटरनेट वरती माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा
https://ah.mahabms.com/

ॲप घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.averta.mahabms

अर्ज करण्याचा कालावधी :
२५ जुलै, २०१९ ते ०८ ऑगस्ट, २०१९ (१५ दिवस)

अर्ज भरण्यास अडचण आल्यास किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा
इ-मेल :- ah@mahabms.com

ZP RECRUITMENT NEW