गावातील निवडणूक म्हटलं कि खूप मोठी गोष्ट समजली जाते तसच आमच गाव. विकास गेला चुलीत पण इलेक्शन च्या नावाखाली आरोप प्रत्यारोप करन सुरु होऊन जात. अरे करायच्या आहे तर विकासाच्या गोष्टी करा न. आणि होत असेल तर गावासाठी काहीतरी करा. म्हणतात नवीन पिढी पण नवीन पिढी कुठे तर पान्ठेल्यांवर किव्वा वोटे राखत. मग या तरुण पिढीचा निवडणुकीच्या नावाखाली वापर करायचा का ? कि यांना सोबत घेऊन नवनवीन योजना आखून गावाचा विकास करायचा रोड कसे असावेत आपला परिसर कसा असावा यावर विचार व्हायला हवा निवडूक तर सोडून द्या हो १ महिना धामधूम असते पण यातून गावाच्या विकासावर लक्ष द्या न कि केवळ एकमेकांना मागे ओढण्यात तुम्ही स्वतः मागे याल यावर करा थोडा विचार. स्वताला सुशिक्षित समजता न तुम्ही मग गावाला मागे का आणता पुढे नेण्याचा प्रयत्न करा न ? मी थोडा प्रयत्न जरी करायला गेलो तरी तोंडावर बोलणारे १०० आणि मागून बोलणारे १०० अरे काहीतरी करू द्या तुमच्यातलाच आहे मी आणि मला काही नको फक्त हवा तो गावाचा विकास. सगळ्यांनी मिळून कोणतीही योजना किव्वा कार्य पार पडता येते असेच मधात याल तर फेकून द्यायला मागे पुढे पाहणार नाही. शांततेत आहे याचा अर्थ असा नाही कि मी सगळ सहन करेल. सहन करण्याची पण सीमा असते म्हणून डोक शांत ठेवा आणि कामाला लागा. काही दिवसात निवडणुका होणार आहे कोणालाही मतदान करा पण थोडा विचार करून कोण गावासाठी झटतो आणि आजपर्यंत जगला याला महत्व द्या पार्ट्या गेल्या खड्ड्यात आणि मंत्री संत्री गेले पुरात... गावाच्या विकासावर लक्ष द्या आणि दाखवून द्या कि आपण पण गावासाठी काहीतरी करू शकतो..
तुमचा
नितीन काळे
गावातील निवडणूक भाग १
तुमचा
नितीन काळे
गावातील निवडणूक भाग १
Great.....
ReplyDelete