मी नितीन काळे सिएससी व्हिएलई कचारी सावंगा या 5000 लोकसंख्येच्या गावातील असून गावाची गरज ओळखून सीएससी सेंटर सुरू केले. याआधी लोकांना छोट्याछोट्या कामासाठी तहसील च्या ठिकाणी जायला लागायचं पण एक सिएससी सेंटर मूळ लोकांच्या समस्यांवर समाधान मिळालं. ज्याप्रमाणे लोकांना सुविधा मिळाल्या त्यामुळं मला रोजगार प्राप्त झाला आणि यामूळ मला एक वेगळी ओळख मिळाली यामुळं मी सीएससी चा आभार मानतो. या छोट्या केंद्राच्या माध्यमातून मी गावामध्ये नवनवीन उपक्रम योजना लोकांपर्यंत पोचवल्या. ज्यामुळं लोकांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजि विषयी जागरूकता निर्माण झाली आणि गावामध्ये डिजिटल इंडिया मार्फत पीएमजीदिशा हा उपक्रम मी राबवला ज्याच्या माध्यमातून मी 210 गावकऱ्यांना डिजिटली साक्षर केले ज्यामुळं त्यांच्यामध्ये एक नवीन उत्साह वाढला. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्ती हा स्वयंपूर्ण असावा आणि डिजिटली साक्षर असावा हेच माझे ध्येय आहे आणि सिएससी मुळे गावात बदल घडून आला आणि लोक डिजिटल युगाशी जोडले गेले त्यामुळं गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये मला श्री.प्रशांत झाडे सर श्री. उमेशजी मानमोडे सर तसेच आकाश गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले ज्यामुळं मी नवनवीन योजना लोकांपर्यत पोहचवू शकलो त्यामुळं मी त्यांचा आभारी आहे.
नितीन काळे (व्हिएलिई)
सिएससी इ गव्हरनन्स इंडिया
No comments:
Post a Comment