अनेक मोठमोठी व्यक्ती सुखविषयी 4 गोष्टी सूनवुन जातात. आणि म्हणतात अस कर म्हणजे तुला सुख मिळेल. सुख म्हणजे नेमकं आहे तरी काय??
आयुष्याच्या या वळणावर सुख म्हणजे पैसे नव्हे काहीजण म्हणतात पैसे असले की सगळं मिळत पण जीवनात काही गोष्टी पैशांन मिळवतात येतात पण पैशांन सुख नाहीच मिळवता येत. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे.
माझ्यामते तर सुख म्हणजे आनंद जो तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टीतून मिळतो. वैयक्तिक जीवनात जीवन जगतेवेळी अनेक प्रश्न मनात येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता संपूर्ण आयुष्य निघून जात.. पण सुखाची जाणीव आणि अनुभव कवचितच अनुभवायला मिळते..
माणसाने सुखासाठी आपले काम जरी काही वेळासाठी सोडले तरी त्याला त्यातून आनंद मिळाला हे महत्वाचे. मी जेव्हा कामामध्ये असतो तेव्हा मी अनुभवतो की आपण हे करतोय यात मला समाधान आणि सुख मिळते का तर याच उत्तर नाही तर सुख कशात मिळते तर इतर गोष्टीत ज्यामुळं माझी कामाची लिंक तुटेल...पण मग काम महत्वाचं की सुख??? हा अजून एक प्रश्न आणि असे प्रश्न न त्यांची मिळणारी उत्तरे याचा मी जेव्हा मागोवा घेतला तर अस लक्षात आलं की लोकांना कामापेक्षा सुखात महत्व जास्त आहे.
मी पण याचाच शोध घेतोय की सुख कुठं मिळेल विकत तर मिळत नाही नाहीतर घेतलं असत. सुख शोधत शोधत अनेकांशी भेटलो पण 10% सुख मिळते आणि 90% काम किव्वा दुःख ज्यामुळं व्यक्ती अजून डिप्रेशन मध्ये जातो.
चला असो इतक्यात मी खूप सुखी आहे कारण इतक्यात अस काहीतरी करतोय ज्यात मला सुखाचा आनंद मिळतो नवीन ओळख वाढते चर्चा आणि गप्पा होतात
माझ्या सर्व हितचिंतकांना धन्यवाद
तुमची अशीच सोबत असुद्या
नितीन काळे
सुखाची चव - भाग 1
संकलन अनुभवातून
No comments:
Post a Comment