Wednesday, 27 June 2018

ओळख माणसांची

एकट्यात राहणारा मी जेव्हा अनेक माणसांच्या गर्दीत राहायला लागलो तेव्हा माझ्या नात्यामध्ये अजून गोडवा निर्माण झालाय. जेव्हा आपला संपर्क अनेक लोकांशी येतो तेव्हा वेगवेळ्या माणसांच्या गर्दीत आपण गोंधळून जातो. आणि त्यातून योग्य माणसाची निवड करायला जीवाची खूपच खटाटोप होते. कोण आपला आणि कोण परका याविषयी मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. मग अशातच काही नवीन लोकांची ओळख होते आणि त्यांना आपण आपल मानायला लागतो. आपल्याला वाटते हीच आपली माणसे आता यांच्याशी मैत्रीचे नाते जोडून पुढील वाटचाल करावी. अनोळखी व्यक्ती मग ओलखीचा केव्हा होतो कळतच नाही. अश्या माणसांच्या गर्दीत सध्या मी अटकलेलो आहोत.

आणि हीच माणसे जीव कि प्राण वाटायला लागलाय. एकप्रकारे म्हणाल तर या माणसांच्या गर्दीत राहण मला आता आवडायला लागलय. हीच माणसे रोज भेटतात रोज माझ्याशी व्यवहार करतात संवाद साधतात. त्यामुळ दिवस कसा निघून जात कळतच नाही. रोज यांची गर्दी मला आपलस करून टाकते. लोक तितके व्यवहार... त्यामुळ अनेक नवनवीन माणसे कशी असतात त्यांचे बोलणे वागणे त्यांच्या समस्या त्यांच्या भावना यांच्याशी अवगत व्हायला मला इतक्या लहान वयात मिळतंय यासाठी मी देवाचे आभारच मानायला हवे.

चला असो  जितकि माणसे जोडल्या जाईल त्यांना माझ्यासोबत राहून आनंदच मिळेल इतक नक्की कारण कुणाला दुखावणे हे माझ्या मनातच नाही सगळ्यांना योग्य न्याय मिळावा आणि लोक आनंदाने जागावे हीच इच्चा.



नितीन काळे
ओळख माणसांची भाग १



No comments:

Post a Comment

ZP RECRUITMENT NEW