आज काही नकळत मनातून भाव सुचताहेत त्यामुळं म्हटलं आज थोडं लिहावं आपल्या नात्यातील गोडव्याविषयी...
तुझ्यामुळे मला मिळालेली ओळख खरच नाविन्यपूर्ण आहे. तू म्हणजे माझ्यासाठी सर्वकाही आहे जसे मला घरचे जवळ आहे तशीच तू पण . लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता प्रेमानं जेवढं जगता येईल तेवढं प्रेमानं जगण्याचा प्रयत्न करूयात. सगळं जरी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी काही न काही राहतेच त्यामुळं जे जवळ आहे त्यात आनंद मानून आपण पुढील वाटचाल करणे अधिकच चांगले..
तू दूर असल्यावर करमत नाही हे जितके खरे तितकंच महत्वाचं म्हणजे तुझी आठवण कायमची सोबत असते आणि मनाला खुणावते अरे थकला का तू अजून काम कर तुला अजून खूप काही मिळवायचे आहे . त्यामुळे एक नवचेतना येऊन पुन्हा काम करण्यास आनंद आणि ताकद मिळते..
देव पण अनोळखी व्यक्तींची भेट घडवून आणतो मग त्यांचंच नात जुळून प्रेमप्रकरण सुरू होत किती योगायोग असतो सगळ काही निमूटपणे सुरू असताना एक भेट होऊन आयुष्याला एक नवीन वळणच मिळून जाते अनोळखी व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवून आपल्या भावना व्यक्त करतात आणि मग मैत्री इतकी घट्ट होते की आयुष्यभर तुटत नाही. वाद होतो भांडणे होतात आणि यातूनच नात अजून घट्ट होऊ लागते आणि एक नवीन प्रेमाचा अंकुर फुलतो...
प्रेमाची डायरी भाग १
संकलन मनातून
आठवण स्वप्नांची
तुझं प्रेम नेहमी तुझ्या सोबत रहावं
ReplyDelete