Tuesday, 22 January 2019

*"काबिल-ए-तारीफ" होने के लिए* *"वाकिफ-ए-तकलीफ" होना पडता है..*

असं म्हटलं जात, "जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण".. पण मनुष्याचं वेगळं असतं, त्याला मोठेपण तर पाहिजे असते पण तकलीफ नको असते.. मोठा माणुस बनायचे दिवा स्वप्न बघायचे आणि शेवटी परिस्थितीला, दुस-या ला दोष द्यायचा..

मित्रांनो..
सर्वांना हवाहवासा वाटणारा यशाच्या शिखरावर झालेला सत्कार चविने कसा असतो, हे एकवेळ चाखून बघा, फक्त एकवेळ.. शतकवीर, मिलेनियर, एमडीआरटी, क्लब मेंबर्स यापैकी काहीही बनून सत्कार स्विकारुन बघा..
ज्यांनी हेवा वाटावा असे यश मिळविले आहे त्यांनी सहन न होणारी कष्ट केले आहेत..

पण लक्षात ठेवा..

"काबिल-ए-तारीफ" होने के लिए
"वाकिफ-ए-तकलीफ" होना पडता है..

*चला बाहेर पडा..!!*

Saturday, 12 January 2019

आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................

आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................

नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना

गेल्या काही दिवसापासून मी सतत पाहतोय आपल्या भागात सीएससी व्हीएली ची अवस्था.... कोणतेच काम नाही आणि आहे ते करण्यासाठी योग्य मदत मिळत नाही शिकण्यासाठी युट्युब किवा कशाचा दुसरा सहारा घ्यावा लागतो. सर्वांनी एकजूट होणे महत्वाचे आहे बाहेर राज्यात सुरु झालेल्या सर्व सुविधा आपल्या राज्यात सुरु व्हाव्या यासाठी आता व्हीएलइनेच एकत्र येणे आवश्यक आहे. नवनवीन सुविधा आपल्या सेंटर वर मिळाव्या यासाठी हा प्रयत्न. मला आशा आहे कि तुम्ही नक्कीच सोबत असाल.
जो पर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकत इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तो पर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालुच राहणार. या जुलुमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद केली की ” देवा तू बा सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर तू निर्माण केलेस. म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिहानी डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गट्टगिळ करावे काय? देवाने उत्तर दिले : ” हे बघ. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे खरी. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं ,नेभळट दिसते की जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुद्धा या वेळी तुझी हि दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटते आहे. तर तुझी हि सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रुबाबदार राहा, चाल करून आलेल्याचा प्रतिकार करण्याचा न्यायबुद्धी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसम्बु नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे: कोण तुला त्रास देतो? कोण तुला खातो? ” या कथे प्रमाणे तुम्ही आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने अत्यन्त प्रभावी अशा संघटनेने राहा.

उद्या होणार्या मिटिंग ला जास्तीत जास्त व्हीएलइ नि सहभागी व्हा आणि होणार्या समस्यांवर उपाय सुचवा आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू

स्थळ : अश्फाक बेग उपाध्यक्ष नागपूर जिल्हा
अन्नपूर्णा माता मंदिर जवळ गड्डीगोदाम नागपूर

नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना

Friday, 11 January 2019

(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)


(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)

पदाचे नाव: 
1.  सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब): 24 जागा
2.राज्य कर निरीक्षक (गट-ब): 35 जागा 
3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब): 496 जागा 
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
1.  पद क्र.1: 01 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
2.पद क्र.2: 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
3.पद क्र.3: 01 मे 2019 रोजी 19 ते 31 वर्षे
Fee: खुला प्रवर्ग: ₹374/-  [मागासवर्गीय: ₹274/-]
परीक्षा केंद्र:  महाराष्ट्रातील 37 जिल्ह्याचे ठिकाण.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2019

(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती


पदाचे नाव: वनरक्षक
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2019
Online अर्ज: Apply Online  [Starting: 14 जानेवारी 2019]

Saturday, 5 January 2019

नागपुर सीएससी संघटना मार्फ़त एक निवेदन ,

नागपुर सीएससी संघटना
मार्फ़त
एक निवेदन ,
ज्यांनी mahaonline चा
Interview दिलेला आहे आणि जे csc मधून mahaonline ची सुविधा सुरु करण्यासाठी उत्सुक आहे त्याबाबत निवेदन.

संपर्क करा -
श्री. नारायण म. आर्वीकर
(अध्यक्ष, नागपुर जिल्हा)
श्रीनिधि संघ कार्यालया समोर महाल, नागपुर
मो. 9881477872
*******************
श्री. अशफाक बेग
(उपाध्यक्ष, नागपुर जिल्हा)
अन्नपूर्ण माता मंदिर जवळ,
गड्डीगोदाम, नागपुर
मो. 9370528601
*********************
श्री. नितिन काळे
(सचिव, नागपुर जिल्हा)
कचारी, सावंगा, ता. काटोल.
मो. 8805826526
**********************
वरील कोणत्याही स्थानावर आपली नोंदणी करणे आवश्क आहे.

सुचना : येताना vle आपले आधार कार्ड सोबत आणावे. 16/12/2018 पर्यत आपल्याकडून प्रतिसाद न आल्यास.... त्यांचे नाव निवेदन पत्रात नमूद केले जाणार नाही, कदाचि त्या vle चा नागपुर सीएससी संघटना तर्फे विचार केला जाणार नाही...
धन्यवाद !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Thursday, 3 January 2019

नवीन आयडिया नवीन बिसिनेस फक्त तुमच्यासाठी

आम्ही ठरवलंय कि आता आदर्श फौंडेशन चे काम गावोगावात आणि शहरात देण्याचे ठरविले आहे ज्यांना खरोखर बिसिनेस करण्यात आवड आहे अश्या व्यक्तींसाठी हि सुवर्ण संधी आहे तुम्ही आमच्या ग्रुप चा भाग होऊन नवनवीन कामे शिकून अतिशय सुंदर बिसिनेस करू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू फक्त तुमचा वेळ आणि सहभाग हवा आहे

लवकरच याविषयी माहिती देण्यात येयील 

इच्छुकांनी खालील मेल वर 

adarshonlineservice@gmail.com वर आपली माहिती Resume स्वरुपात पाठवावी.

Registration for New Adarsh Foundation Business network

Send Your Resume And Center Photograph for our Business Network

1- Adhar Card
2- Photoghraph Center Indour Outdour
3- Location
4- Bank Passbook Checkbook & netbanking
6- Resume
7- Passport Photo



send Mail to adarshonlineservice@gmail.com

आम्ही अशी सुवर्णसंधी घेऊन येत आहे जे बेरोजगार व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून देईल ज्याची लोकांना नितांत आवश्यकता असते अशी बिसिनेस आयडिया.. नेहमी आमचा सहयोग तुम्हाला लाभेलच यात काही शंकाच नाही. सध्या यावर काम सुरु आहे त्यामुळे लवकर च नवीन माहिती देण्यात येयील.



ZP RECRUITMENT NEW