Saturday, 12 January 2019

आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................

आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................

नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना

गेल्या काही दिवसापासून मी सतत पाहतोय आपल्या भागात सीएससी व्हीएली ची अवस्था.... कोणतेच काम नाही आणि आहे ते करण्यासाठी योग्य मदत मिळत नाही शिकण्यासाठी युट्युब किवा कशाचा दुसरा सहारा घ्यावा लागतो. सर्वांनी एकजूट होणे महत्वाचे आहे बाहेर राज्यात सुरु झालेल्या सर्व सुविधा आपल्या राज्यात सुरु व्हाव्या यासाठी आता व्हीएलइनेच एकत्र येणे आवश्यक आहे. नवनवीन सुविधा आपल्या सेंटर वर मिळाव्या यासाठी हा प्रयत्न. मला आशा आहे कि तुम्ही नक्कीच सोबत असाल.
जो पर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकत इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तो पर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालुच राहणार. या जुलुमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद केली की ” देवा तू बा सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर तू निर्माण केलेस. म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिहानी डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गट्टगिळ करावे काय? देवाने उत्तर दिले : ” हे बघ. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे खरी. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं ,नेभळट दिसते की जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुद्धा या वेळी तुझी हि दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटते आहे. तर तुझी हि सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रुबाबदार राहा, चाल करून आलेल्याचा प्रतिकार करण्याचा न्यायबुद्धी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसम्बु नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे: कोण तुला त्रास देतो? कोण तुला खातो? ” या कथे प्रमाणे तुम्ही आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने अत्यन्त प्रभावी अशा संघटनेने राहा.

उद्या होणार्या मिटिंग ला जास्तीत जास्त व्हीएलइ नि सहभागी व्हा आणि होणार्या समस्यांवर उपाय सुचवा आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू

स्थळ : अश्फाक बेग उपाध्यक्ष नागपूर जिल्हा
अन्नपूर्णा माता मंदिर जवळ गड्डीगोदाम नागपूर

नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना

No comments:

Post a Comment

ZP RECRUITMENT NEW