Thursday, 28 June 2018

शोध सुखाच्या चवीचा

अनेक मोठमोठी व्यक्ती सुखविषयी 4 गोष्टी सूनवुन जातात. आणि म्हणतात अस कर म्हणजे तुला सुख मिळेल. सुख म्हणजे नेमकं आहे तरी काय??

आयुष्याच्या या वळणावर सुख म्हणजे पैसे नव्हे काहीजण म्हणतात पैसे असले की सगळं मिळत पण जीवनात काही गोष्टी पैशांन मिळवतात येतात पण पैशांन सुख नाहीच मिळवता येत. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे.

माझ्यामते तर सुख म्हणजे आनंद जो तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टीतून मिळतो. वैयक्तिक जीवनात जीवन जगतेवेळी अनेक प्रश्न मनात येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता संपूर्ण आयुष्य निघून जात.. पण सुखाची जाणीव आणि अनुभव कवचितच अनुभवायला मिळते..

माणसाने सुखासाठी आपले काम जरी काही वेळासाठी सोडले तरी त्याला त्यातून आनंद मिळाला हे महत्वाचे. मी जेव्हा कामामध्ये असतो तेव्हा मी अनुभवतो की आपण हे करतोय यात मला समाधान आणि सुख मिळते का तर याच उत्तर नाही तर सुख कशात मिळते तर इतर गोष्टीत ज्यामुळं माझी कामाची लिंक तुटेल...पण मग काम महत्वाचं की सुख??? हा अजून एक प्रश्न आणि असे प्रश्न न त्यांची मिळणारी उत्तरे याचा मी जेव्हा मागोवा घेतला तर अस लक्षात आलं की लोकांना कामापेक्षा सुखात महत्व जास्त आहे.

मी पण याचाच शोध घेतोय की सुख कुठं मिळेल विकत तर मिळत नाही नाहीतर घेतलं असत. सुख शोधत शोधत अनेकांशी भेटलो पण 10% सुख मिळते आणि 90% काम किव्वा दुःख ज्यामुळं व्यक्ती अजून डिप्रेशन मध्ये जातो.

चला असो इतक्यात मी खूप सुखी आहे कारण इतक्यात अस काहीतरी करतोय ज्यात मला सुखाचा आनंद मिळतो नवीन ओळख वाढते चर्चा आणि गप्पा होतात

माझ्या सर्व हितचिंतकांना धन्यवाद
तुमची अशीच सोबत असुद्या

नितीन काळे
सुखाची चव - भाग 1
संकलन अनुभवातून

Wednesday, 27 June 2018

ओळख माणसांची

एकट्यात राहणारा मी जेव्हा अनेक माणसांच्या गर्दीत राहायला लागलो तेव्हा माझ्या नात्यामध्ये अजून गोडवा निर्माण झालाय. जेव्हा आपला संपर्क अनेक लोकांशी येतो तेव्हा वेगवेळ्या माणसांच्या गर्दीत आपण गोंधळून जातो. आणि त्यातून योग्य माणसाची निवड करायला जीवाची खूपच खटाटोप होते. कोण आपला आणि कोण परका याविषयी मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. मग अशातच काही नवीन लोकांची ओळख होते आणि त्यांना आपण आपल मानायला लागतो. आपल्याला वाटते हीच आपली माणसे आता यांच्याशी मैत्रीचे नाते जोडून पुढील वाटचाल करावी. अनोळखी व्यक्ती मग ओलखीचा केव्हा होतो कळतच नाही. अश्या माणसांच्या गर्दीत सध्या मी अटकलेलो आहोत.

आणि हीच माणसे जीव कि प्राण वाटायला लागलाय. एकप्रकारे म्हणाल तर या माणसांच्या गर्दीत राहण मला आता आवडायला लागलय. हीच माणसे रोज भेटतात रोज माझ्याशी व्यवहार करतात संवाद साधतात. त्यामुळ दिवस कसा निघून जात कळतच नाही. रोज यांची गर्दी मला आपलस करून टाकते. लोक तितके व्यवहार... त्यामुळ अनेक नवनवीन माणसे कशी असतात त्यांचे बोलणे वागणे त्यांच्या समस्या त्यांच्या भावना यांच्याशी अवगत व्हायला मला इतक्या लहान वयात मिळतंय यासाठी मी देवाचे आभारच मानायला हवे.

चला असो  जितकि माणसे जोडल्या जाईल त्यांना माझ्यासोबत राहून आनंदच मिळेल इतक नक्की कारण कुणाला दुखावणे हे माझ्या मनातच नाही सगळ्यांना योग्य न्याय मिळावा आणि लोक आनंदाने जागावे हीच इच्चा.



नितीन काळे
ओळख माणसांची भाग १



प्रेम तुझं आणि माझं

आज काही नकळत मनातून भाव सुचताहेत त्यामुळं म्हटलं आज थोडं लिहावं आपल्या नात्यातील गोडव्याविषयी...

तुझ्यामुळे मला मिळालेली ओळख खरच नाविन्यपूर्ण आहे. तू म्हणजे माझ्यासाठी सर्वकाही आहे जसे मला घरचे जवळ आहे तशीच तू पण . लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता प्रेमानं जेवढं जगता येईल तेवढं प्रेमानं जगण्याचा प्रयत्न करूयात. सगळं जरी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी काही न काही राहतेच त्यामुळं जे जवळ आहे त्यात आनंद मानून आपण पुढील वाटचाल करणे अधिकच चांगले..

तू दूर असल्यावर करमत नाही हे जितके खरे तितकंच महत्वाचं म्हणजे तुझी आठवण कायमची सोबत असते आणि मनाला खुणावते अरे थकला का तू अजून काम कर तुला अजून खूप काही मिळवायचे आहे . त्यामुळे एक नवचेतना येऊन पुन्हा काम करण्यास आनंद आणि ताकद मिळते..

देव पण अनोळखी व्यक्तींची भेट घडवून आणतो मग त्यांचंच नात जुळून प्रेमप्रकरण सुरू होत किती योगायोग असतो सगळ काही निमूटपणे सुरू असताना एक भेट होऊन आयुष्याला एक नवीन वळणच मिळून जाते अनोळखी व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवून आपल्या भावना व्यक्त करतात आणि मग मैत्री इतकी घट्ट होते की आयुष्यभर तुटत नाही.  वाद होतो भांडणे होतात आणि यातूनच नात अजून घट्ट होऊ लागते आणि एक नवीन प्रेमाचा अंकुर फुलतो...

प्रेमाची डायरी भाग १
संकलन मनातून
आठवण स्वप्नांची

ZP RECRUITMENT NEW